One home secret part -कोनावडा
कोनावडा संध्याकाळची वेळ होती .दिवसभराच्या व्यस्त कामातून सूर्यही आता माघार घेत होता. मावळतीला आलेला सूर्य थोडावेळ थांबेल का? असा अट्टाहास आम्ही मित्र करत होतो. अंगणात आट्यापाट्याचा खेळ तसा रंगातच आला होता. तेवढ्यात घरातून आईची हाक आली. “अरे ए बाबू चला आंघोळीला’’. आईचा आवाज ऐकू आल्यावर आमच्या मित्रांमध्ये एकच गोंधळ उडाला. आम्ही सैरावैरा पळू लागलो . मी कळत नकळत मोठ्या दादाला शोधायला लागलो. एक चक्कर घरा भोवतीही मारली. ‘कुठे गेला कुणास ठाऊक’... मी मनामध्येच म्हणालो....