One home secret part -कोनावडा
कोनावडा
संध्याकाळची वेळ होती .दिवसभराच्या व्यस्त कामातून सूर्यही आता माघार घेत होता.
मावळतीला आलेला सूर्य थोडावेळ थांबेल का? असा अट्टाहास आम्ही मित्र करत होतो.
अंगणात आट्यापाट्याचा खेळ तसा रंगातच आला होता. तेवढ्यात घरातून आईची हाक आली.
“अरे ए बाबू चला आंघोळीला’’. आईचा आवाज ऐकू आल्यावर आमच्या मित्रांमध्ये एकच गोंधळ उडाला.

आम्ही सैरावैरा पळू लागलो . मी कळत नकळत मोठ्या दादाला शोधायला लागलो.
एक चक्कर घरा भोवतीही मारली.
एक चक्कर घरा भोवतीही मारली.
‘कुठे गेला कुणास ठाऊक’... मी मनामध्येच म्हणालो. तेवढ्यात आईचा परत आवाज आला.
“ शिरू कुठे गेला रे, दुपार पासून गायब झालाय,कधी सांगून जात नाही’’. मी खाली मान घालून
“ शिरू कुठे गेला रे, दुपार पासून गायब झालाय,कधी सांगून जात नाही’’. मी खाली मान घालून
डोकं खाजवत म्हणालो. “त्यालाच त शोधतोय ना ..ग” .
“मी बघते त्याच काय करायचं तू चल कुठे गेला असेल.
तसाआहे रागाऊ, कोणाचा राग आला असेल त्याला, कसला राग येतो काय माहित
असेल मित्रांकडे". आई कमरेला पदर कमरेला पदर खोचत म्हणाली .दुपारपासून तसा दिसलाच नव्हता.
तसाआहे रागाऊ, कोणाचा राग आला असेल त्याला, कसला राग येतो काय माहित
असेल मित्रांकडे". आई कमरेला पदर कमरेला पदर खोचत म्हणाली .दुपारपासून तसा दिसलाच नव्हता.
“ मी म्हटलं गेला असेल कुठल्यातरी मित्राकडे”.
माझ्या मनाचा मात्र खोळंबा झाला काय करावे सुचत नव्हते. बापुही कामावरून यायची वेळ झाली होती.
सूर्य आता सातासमुद्रापार गेला होता. दिवस दिवस सरुन रात्र सुरू झाली होती .
आई जेवण करण्यात मग्न होती.मला तिथूनच म्हणाली .
“हे विनू…. शिरू काय तुला सांगून तर गेला नाही ना”
आता बापू आला तर खरं नाही, आता माझ्या मनात चित्रविचित्र विचारांनी गवसणी चालू केली .
तेवढ्यातच अंगणातून चपलांचा आवाज ऐकू आला. पायरीवर बापू बसता बसताच म्हणाला
“विनू पाणी आन रं जरा.आईनं पिठाच्या हातानेच, थंड मडक्या मधून पाणी काढून माझ्याकडे दिले.
तेवढ्यातच अंगणातून चपलांचा आवाज ऐकू आला. पायरीवर बापू बसता बसताच म्हणाला
“विनू पाणी आन रं जरा.आईनं पिठाच्या हातानेच, थंड मडक्या मधून पाणी काढून माझ्याकडे दिले.
“ विनू, हे पाणी बाबांना दे”.
मी मुकाट्याने पाणी घेऊन बाबांना देऊ लागलो पाणी देता देता खाली मान घालून म्हणालो.
“ बापू …. शिरू दादा अजून नाय आला घरी”.
“ बापू …. शिरू दादा अजून नाय आला घरी”.
बापूने तोंडात पाणी घेऊन चूळ भरली आणि म्हणाला.
"यल तां कुठं जात नाय….आज काल लय नाटकं चालली आहेत त्याची.
.बसला असल कुठल्यातरी कोनावड्यात”
"यल तां कुठं जात नाय….आज काल लय नाटकं चालली आहेत त्याची.
.बसला असल कुठल्यातरी कोनावड्यात”
कोनावडा... ? कोनावडा…?आईच्या तोंडून सतत ऐकू येणारा शब्द
कोंबड्यांचा खुराडा कोनावड्यात असतो एवढंच माहिती होतं पण माणसंही बसतात हे आज कळालं.
कोंबड्यांचा खुराडा कोनावड्यात असतो एवढंच माहिती होतं पण माणसंही बसतात हे आज कळालं.
मला याचा अर्थ हळूहळू कळायला लागला होता. म्हणजे , घरातील एका पडक्या खोलीचा कोपरा म्हणजे कोनावडा !
रात्र खूप झाली होती, रात किड्यांचा किर्र आवाज कानावर नाद करत होता.
मातीच्या तेलाचा दिवा घेऊन बापू आणि मी घराच्या पुढच्या पडवीत शोधण्यास सुरुवात केली.
त्यांच्या मागोमाग हळूहळू माझी बारीक नजर प्रत्येक कोपऱ्यात टाकत होतो.
घराच्या चारही बाजूला लांबलचक पाडव्या असल्याने सर्वत्र प्रकाश पोहोचत नव्हता.

आईचा स्वयंपाक बहुतेक आटोपला होता. तीही शेजारीन काकुला हाका मारून विचारू लागली ... “आमचा
शिरू आला हाय काय... कुठं बघितलास काय...?”.
काकूने ….नाही…. म्हटल्यावर आई परत घरात आली .आमच्या बरोबर ती शोधू लागली .
“ माळ्यावर तर लपला नसल ना.नाय मारायला पाहिजे व्हतं.
“ माळ्यावर तर लपला नसल ना.नाय मारायला पाहिजे व्हतं.
मास्तरने दिलेला अभ्यास पूरा केलान नाय म्हणून तुम्ही मारलात ना”.
आई जरा रागातच म्हणाली .
आई जरा रागातच म्हणाली .
“मी त्याला अभ्यास नाय केलान म्हणून अजिबात मारला नाय.
त्याची अभ्यास करण्याची पद्धत चुकलेली व्हती.
त्याची उत्तरं तर …एखाद्या..कोनाड्यात टाकलेल्या मोडक्यातोडक्या सामाना सारखी वाटतं व्हती.
त्याची उत्तरं तर …एखाद्या..कोनाड्यात टाकलेल्या मोडक्यातोडक्या सामाना सारखी वाटतं व्हती.
त्यातला उत्तरामधला मुख्य भाग यगळा ;
त्याचं उत्तर यगळं, कसं व्हनार याचं कुणास ठाऊक”.
त्याचं उत्तर यगळं, कसं व्हनार याचं कुणास ठाऊक”.
बापूने तावातावाने बोलून पुढच्या पडवीत पाऊल टाकले. मग मी पण, त्याच्या मागोमाग माझी भिरभिरती
नजर फिरवत हिंडू लागलो . वातावरण एकदम शांत होतं कोणाचाही कसला आवाज येत नव्हता.
तेवढ्यात कुठून तरी बारीक हुंदके देऊन रडण्याचा आवाज येऊ लागला.
तसे माझे कान उंचावले माझी नजर आवाजाच्या दिशेने गेली.
“आई मला भूक लागलीय आई मला भूक लागलीतय….” शिरू दादा रडत रडत बोलत होता.
दादाच्या पोटा मधला एक कोनावडा रिकामा झाला म्हणून, दादाला भूक लागलेली आहे.
हे मला कळत नकळत जाणवत होते.आई पटकन पुढे झाली. बघते तर काय….
एका टोपली वर फाटके बारदान टाकून,आत मध्ये खरचं शिरू दादा रडत होता
माझ्या जीवात जीव आला . आई पटकन एका हातात दिवा घेऊन पटकन पुढे झाली.
बारदान बाजूला केलं उघडून दादाला बाहेर काढत म्हणाली. “ आरं शिरू काय तुझं हं नाटक".
घाबरलेल्या चेहऱ्यांनी दचकत दचकत दादाने आईला मिठी मारली.
बारदान बाजूला केलं उघडून दादाला बाहेर काढत म्हणाली. “ आरं शिरू काय तुझं हं नाटक".
घाबरलेल्या चेहऱ्यांनी दचकत दचकत दादाने आईला मिठी मारली.
बापूनं मात्र दादाचा हात धरून ओटीवर फरपटत आणलं आणि समजावत म्हणाला.
“शिरू बाला” मी पण दादा च्या बाजूला हळूच जाऊन बसलो .बाबा पु.ढे बोलत होते.
“शिरू बाला” मी पण दादा च्या बाजूला हळूच जाऊन बसलो .बाबा पु.ढे बोलत होते.
“शिक्षण ही एक अशी रचना हाय की,तिची कितीही रितसर बांधणी करीत गेलो तेवढे कमीच असते.
म्हणजे शिक्षण कितीहि आत्मसात करावं तितकं कमीच.मी जरी अडाणी असलो तरी असाक्षर अजिबात
नाय. शिक्षणाअभावी राहिलेले आम्ही,आमच्या वाट्याला आलं फक्त दुःख आणि कष्ट प्रत्येक घराला
एक भकास ओसाड कोनावडा असतो. तसाच प्रत्येक सुशिक्षित समाज्याचा एक अबोल,अशिक्षित,
अंधश्रद्धाळू,भोळाभाबडा,अदृश्य कोनावडा असतो. माझ्यासारखे कित्येक अडाणी लोक त्यात कोंबून
ठेवले जातात. तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न जरी केला तरी,अपमानित करून परत त्याच्यात लोटले जाते.
ज्यांनी हा कोनावडा पाहिला त्यांच्या भयान यातना हृदयाला भेदून टाकणाऱ्या आहेत.
तुम्हाला त्यात जाऊ देणार नाही मी"
बाबांचे डोळे पाणावले होते.हळूच आपले अश्रू लपवत म्हणाले.
"तुम्ही शिक्षण चांगले घेतले तर,सुशिक्षित समाजातील सर्व कोनावडे उजेडात येऊन ओसाड पडतील. ते कधीही
परत अंधारणार नाहीत ....कधी परत अंधारणार नाहीत”.
आम्ही दोघ भाऊ निरागस डोळ्यांनी बापू कडे बघत राहिलो. बापू मात्र घरात आपल्या दिशेने निघून गेला .
रोहिदास सरिता सहदेव वीर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा