One cottage -चिरेबंदी वाडा.... कविता
चिरेबंदी वाडा....
उभा चिरेबंदी वाडा
त्याला चार कोनी भिंती...
चार बाजूस खिडक्या
नाही उघडल्या जाती ...
छत ओबड धोबड
सदा असे भिजलेलं...
पडे घामाचा पाऊस
कधी नाही धसलेलं...
मोठया कष्टाची पायरी
हळू हळू चढताना....
होई स्पर्श भावनांचा
धाप लागे घडताना....
आत संस्कार खजाना
बंद नाही कधी केला...
कोणी कितीही लुटावा
तेव्हा वाढत तो गेला....
त्याची प्रेमाची सावली
जेव्हा पडे माझ्यावर....
तेव्हा बघतच राहावं
एका स्तब्ध जाग्यावर....
उभा चिरेबंदी वाडा
त्याला चार कोनी भिंती...
चार बाजूस खिडक्या
नाही उघडल्या जाती ...
छत ओबड धोबड
सदा असे भिजलेलं...
पडे घामाचा पाऊस
कधी नाही धसलेलं...
मोठया कष्टाची पायरी
हळू हळू चढताना....
होई स्पर्श भावनांचा
धाप लागे घडताना....
आत संस्कार खजाना
बंद नाही कधी केला...
कोणी कितीही लुटावा
तेव्हा वाढत तो गेला....
त्याची प्रेमाची सावली
जेव्हा पडे माझ्यावर....
तेव्हा बघतच राहावं
एका स्तब्ध जाग्यावर....
------------------------------------------------------------
English translation :
Chirebandi Wada ....
Vertical chisel castle
It has four angled walls ...
Four side windows
No open cast ...
The roof is rough
Always soaked ...
Rain of sweat falls
Never collapsed ...
A step of great difficulty
Slowly climbing ....
Hoi touch feelings
When shortness of breath occurs ....
Inside the sacrament treasure
Never closed ...
No matter how much one robs
When he grew up ....
The shadow of his love
When it falls on me ....
So keep watching
In a quiet place ....
R. S. Veer.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा