first day of school शाळेचा पहिला दिवस
आयुष्याची भुक....... शाळेच्या पहिल्या दिवशी , अर्ध्या दिवसानी घरी आलो आई होती ऊभी शेतात, तिच्यापाशी पळत गेलो... डोळ्यात डोळे घालून आई, माझ्याकडे बघत होती तिच्या डोळ्यात नाही आलं पाणी, हिच का तिची प्रेमळ प्रिती........ माझे निरागस डोळे, तिच्या रागात बंदिस्त झाले एका मागुन एक मग सारे, तिक्ष्ण मारांचे सुटले भाले..... बाप हे सर्व बघत होता, न बघताच ईशारे करत होता मग हळुच जवळ घेवून मला, गोंडसपणे न्हाहळत होता..... सांगत होता कशाला केलीस, एवढी भली मोठी चुक आयुष्याच्या वाटेवर कधी, नाही भागणार तुझी भुक..... तिथेच कळली आईची माया, ...