first day of school शाळेचा पहिला दिवस
आयुष्याची भुक.......
शाळेच्या पहिल्या दिवशी ,
अर्ध्या दिवसानी घरी आलो
आई होती ऊभी शेतात,
तिच्यापाशी पळत गेलो...
डोळ्यात डोळे घालून आई,
माझ्याकडे बघत होती
तिच्या डोळ्यात नाही आलं पाणी,
हिच का तिची प्रेमळ प्रिती........
माझे निरागस डोळे,
तिच्या रागात बंदिस्त झाले
एका मागुन एक मग सारे,
तिक्ष्ण मारांचे सुटले भाले.....
बाप हे सर्व बघत होता,
न बघताच ईशारे करत होता
मग हळुच जवळ घेवून मला,
गोंडसपणे न्हाहळत होता.....
सांगत होता कशाला केलीस,
एवढी भली मोठी चुक
आयुष्याच्या वाटेवर कधी,
नाही भागणार तुझी भुक.....
तिथेच कळली आईची माया,
आणि तिथेच कळला बाप
वज्राहून या कठिण मायेचा,
बसला मनावर माझ्या चाप......
— रोहिदास सरिता सहदेव वीर .
-------------------------------------------------------
English translation :
FIRST DAY OF SCHOOL
On the first day of school,
We came home in half a day
The mother was standing in the field,
Ran to her ...
Mother with eyes in her eyes,
Was looking at me
There were no tears in her eyes,
Hitch why her loving love ........
My innocent eyes
Her anger subsided
One after another
Spears of sharp blows .....
Dad was watching it all,
He was gesturing without looking
Then slowly take me closer,
Was bathing cutely .....
What were you saying, Kelly,
Such a big mistake
Ever on the road to life,
Your hunger will not run away .....
That's where I found my mother's love,
And that's where Dad found out
This hard love from Vajra,
Just put my pressure on my mind ......
Nice 👌 खूप छान लिहिली आहेस.
उत्तर द्याहटवाखुपच छान आहे आई बापा चे मुलावरच्या प्रेमाचा सुंदर संकल्पना मांडली आहे .
उत्तर द्याहटवाधन्यवाद.......
उत्तर द्याहटवा