My father -कधि न कळलेला बाप
कधी न कळलेला बाप
बाप एक सुर्य आहे,
कधी न राञी मावळणारा
आणि कधी न निष्तेज होणारा
सर्व जग प्रकाशित करुन स्वत: ज्वलंत असणारा....
बाप एक तारा आहे,
कधी न नयनी दिसणारा,
अन् कधी न तेज लुकलुकणारा
निळ्याभोर नभात माञ दिन-रात उमगणारा.....
बाप एक पर्वत आहे,
कधी न उंची मोजणारा,
अन् कधी न गगनभेद करणारा
स्वत: तटस्त सज्ज राहून,स्वत्व जपत रहाणारा...
बाप एक सागर आहे,
कधी न तट असणारा,
अन् कधी न स्तब्ध बसणारा
लहान-थोर नौकांना माञ, खांद्यावरती पेलणारा.....
बाप एक माणूस आहे
माणूसपण जपणारा,
अन् माणसात सदैव राहूनी
आपल्या माणसातले माणूसपण कधी न मोक्षास लावणारा.......
बाप एक अशी कथा आहे,
सांगत राहिल सांगणारा,
अन् ऐकत राहिल ऐकणारा,
पानं संपून पुस्तकही संपेल,
असा बाप आहे मनात वसणारा.....
- आर. एस. वीर
-----------------------------------------------------------
English translation :
THE FATHER
The father is a sun
The Queen never dies
And never fading
Self-igniting by illuminating the whole world ....
The father is a star,
Never-before-seen,
Never shining bright
I grow up day and night in the blue sky .....
Baap is a mountain,
Never measuring height,
And never skyrocketing
Being self-neutral, self-preserving ...
The Father is an ocean,
Never shore
And never stops
Mana on small and big boats, carrying on the shoulders .....
The father is a man
Caring for man,
I will always live in another person
The one who never saves the humanity in your man .......
The father is such a story,
Keep telling
The one who keeps listening,
The book will end with the pages,
Such a father lives in the mind .....
- R.S. VEER
बाप जरी रागवाला तरी त्याच्या मनला लगेच पाझर पुटतो. म्हणून बाप हा बाप असतो. यांची सुंदर कल्पना या कविते तु मांडली गेली आहे .
उत्तर द्याहटवा