The farmer -शिवार
शिवार....
बाबा तुझ्या शिवारावर
लक्ष माझं पडलंच नाही...
कित्येक पक्षी राहून गेले
कधी कुणाला कळलंच नाही..
तुझं शिवार कस हिरवं गार
कधीच नाही सुकायचं...
हिरव्या हिरव्या पानांनी
तुझंच गीत म्हणायचं...
तेव्हा फुलांची मजा होती
तुझ्याच कवेत फुलायची....
मनासारखं झालं ना की
हळूच कुशीत शिरायची...
पण तसं आता होत नाही
पक्षी आता मोठे झालेत....
जीवनसाथी मिळाले काय
लगेच फुर्रकन उडून गेलेत....
फुलांनी ही साथ सोडली
रंगहिन त्यांना वाटू लागलंय..
तूझ्या संगती काढलेलं दिवस
कधी येतील वाटू लागलंय....
बाबा तुझ्या शिवारावर
लक्ष माझं पडलंच नाही...
कित्येक पक्षी राहून गेले
कधी कुणाला कळलंच नाही..
तुझं शिवार कस हिरवं गार
कधीच नाही सुकायचं...
हिरव्या हिरव्या पानांनी
तुझंच गीत म्हणायचं...
तेव्हा फुलांची मजा होती
तुझ्याच कवेत फुलायची....
मनासारखं झालं ना की
हळूच कुशीत शिरायची...
पण तसं आता होत नाही
पक्षी आता मोठे झालेत....
जीवनसाथी मिळाले काय
लगेच फुर्रकन उडून गेलेत....
फुलांनी ही साथ सोडली
रंगहिन त्यांना वाटू लागलंय..
तूझ्या संगती काढलेलं दिवस
कधी येतील वाटू लागलंय....
आर. एस. वीर
----------------------------------------------------------
English translation :
Shivar ....
Baba on your side
I didn't pay attention ...
Several birds remained
No one ever knew ..
Make your camp green
Never dry ...
With green leaves
I want to sing your song ...
The flowers were fun then
Yours sincerely ....
It didn't feel right
Next to Cushi ...
But that is not happening now
The birds have grown up now ....
What a spouse
Immediately Furrakan flew away ....
The flowers left together
They are starting to feel colorless.
The day your company was taken out
I wonder when they will come ....
R.s veer

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा