Father story- बाप



        बाप 

चार ओळी बापावरती लिहायला गेलो 
शब्द शब्द जुळत गेला आणि मी मात्र सुखावत गेलो. 
सुरवात कशी करावी उमजत नव्हतं
बापाला समानार्थी शब्द शोधताना
पेनाचं टोक मात्र खंगत  होतं
पेनातली  शाई  संपली  मी  मात्र  परत  परत  भरत गेलो.......

फाटलेली बनियान आणि पिकलेले  केस
चपलाचे तर  चार  तुकडे  झाले  होते
उभ्या आयुष्याची  शिदोरी  पाठीशी  बांधून
पोट  खोल वर  गेलं होते
पण  डोळे  नुसते  पेटते  दिवे
मी  पाहताच  क्षणी  उजालून  गेलो .....

 एक  गोष्ट मला  नक्की  त्याची  आवडायची
काल्या  कुट्ट  चेहऱ्यावरच्या  मिशीला  पिळ  घालायची
चीर  पडलेल्या ओठांमध्ये  मात्र गाभाऱ्यातील  नक्षीकाम  पाहत  राहिलो...

बाप जर एक  गोष्ट  असेल ना 
 तर  मी मात्र  त्यातील ओळी  असेन
शब्दही  त्याचेच  त्याने  व्हावे
कारण   ह्या अक्षराच्या  धिगाऱ्यात  मी  एक  निमित्त  झालो....
                       आर. एस. वीर. 





-----------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

My father -कधि न कळलेला बाप

Abhangvani अभंग - माऊली