Lockdown असा ही एक
Lockdown असाही एक
"लॉकडाऊन" म्हणजे ते.. रोजचे सर्व व्यवहार बंद असंच ना....
घडाळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई कोरोना माहामारीच्या विळख्यात जवळपास अस्थावेस्थ झाली होती. त्यामुळे हातातला काम धंदा सोडून सर्व लोकं घरीच बसले होते. कित्येक मित्रांनी लोकांची सेवा करताना जीव गमावले होते.त्यांच्या गेल्याची बातमी ऐकताच हृदयात कंप सुटायचा, मन थरकाप व्हायचं, झोपेतून अचानक जागा व्हायचो, चित्र विचित्र स्वप्नाचा बाजार मनामध्ये घोळ घालत होता. त्यामुळे मी स्वतःला कसा बसा सावरत होतो.
रोज संध्याकाळी गावाच्या वॉट्सअप ग्रुपवर खुप चर्चा चालल्या होत्या. कोरोनामुळे कोण वाचणार नाही.. कोरोना खुप भयंकर आहे..... आज किती केसेस मिळाल्या... आज किती लोक मेले.... किती बरे झाले..... असं बरंच काही.पण मात्र मिणमिणत्या डोळ्यांनी मॅसेज वाचायचो आणि एखाद्या जखमी जनावरासारखं गप्प ग्रुपमधे पडून राहायचो.
अशीच एका रात्री दहा च्या सुमारास ग्रुप वर चर्चा होत होती. चर्चा गावाला जाणार्यांबद्दल होती मुंबईकर मंडळीना कुठे होम कॉरंटाईन करायचे. काय सोय करावी लागेल आणि बरंच काही... शेवटी आम्ही कोकणी माणसं जीवाला जीव देणारी अशा चर्चा होणं साहजिकच होत्या.
एक दिवस रात्री अकराच्या सुमारास माझा फोन वाजला . मी अनोळखी नंबर बघून लगेच उचलला . समोरून ... "हॅलो मंग्या". मी लगेच आवाज ओळखला. "हा बोला साहेब" मी नम्रपणे म्हणालो. कित्येक जणांना फसवून पैसे घेतलेला कुचकामी स्वयंमघोषित कार्यकर्ता होता. कधी फोन न करणारा आज कशी आठवण झाली कुणास ठाऊक. मी मनात म्हणालो
" हा.. बोल संज्या दा"
"काय नाय रे... तु वॉटसअपवर बोलत होतास ना की मंडळाने गावातील लोकांना मदत करायची म्हणून, तुझ्याकडे पैसे जास्त झालेत काय"."तसं नाय रे... माझ्या मनात आलं म्हणून मी बोललो मंडळाने निराधार लोकांना मदत करावी आपल्या मंडळाचं नाव मोठं होईललोकं नाव काढतील "
"मग मला दे थोडेसे.... पैसे" मला धाकात संज्या बोलला. आधीच दोन महिने कंपनीने पगार दिला नव्हता आता हे नवीन लफडं. मी सरळ नायच बोललो. "माझा पगारच झाला नाही अजून"
"गावाला येणार आहेस का" संज्या निर्लज्ज हसऱ्या आवाजात म्हणाला. "नाही रे"... तसा रागातच फोन ठेवला त्यानं. आता माझ्याहि मनात हुरहूर लागली होती गावाला जाण्यासाठी पण करणार काय.... मला माझ्या डोळ्यासमोर माझी नैतिक जबाबदारी दिसत होती. जी माझी माणसं माझ्याकडे आर्थिक पाठबळीची अपेक्षा करून मागे होती, त्यांना काय बोलू. कोरोनाच्या महामारी पेक्षा उपासमारी हा भयानक रोग लागणार होता त्याचा पुसटचा अंदाज मला लागला होता. आणि त्याचा बळी मीही झालो असतो.
"हा मार्ग तूच निवडला आहे ना, मग हो मार्गस्थ आणि लढ. " मी मनातच म्हणालो. दोन दिवसानी म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीस आमचे बरेच लोक गावाला गेले.
त्यांना एका घरात चौदा दिवस "होम कॉरंटाईन" केलं गेलं. गाववाल्यानी मुंबईकरांची राहण्याची चांगली व्येवस्था केली होती. काही कमी पडू दिलं नाही.
कोणालाच कल्पना नव्हती पुढे काय होणार किती दिवस लॉकडाऊन मध्ये फसणार आहोत.
कमवून खाण्याची सवय असल्यामुळे कोण कोणापुढे हात पसरत नव्हते. ना उपाशी राहणारे मागत होते ना खाणारे देत होते नुसती 'झाकली मूठ सव्वालाखाची'. आता मुंबईवाल्याचं होमेकॉरंटाईन संपलं होतं लोकं आता फिरू लागली होती आणि तो संज्याही..... एक दिवस संध्याकाळी संज्या आमच्या घरी गेला. घरात आई आणि बायको होती.
संज्या आईला ओरडून म्हणाला " तुझ्या पोराला काय पैसे कमवायला ठेवलास काय आम्ही काम धंदा सोडून गावाला आलो. उद्या काय झालं आणि मेला तर गावाला नाय आणणार तेथेच क्रियाकर्म करतील".... बायकोच्या डोळ्यात लगेच पाणी आलं आणि आईच्या हि;हे त्याचे शब्द मन हेलावून टाकणारे होते.
काय सांगावं याला आमच्या घरात काय शिजत ते, एकटा कमावणार सात आठ माणसं खाणार , त्यात हातावर पोट कमावणार तेव्हा खाणार.मग कोणतेही संकट आलं तर घाबरण्याचं कारण नव्हतं मरणाची भीती तर केव्हाच संपलीय होती.
कोरोनासारखी हजार संकट आली तरी मी अंगावर घेण्यास तयार होतो.
तीन चार वेळा संज्या असा येऊन घरच्यांना बोलला माझ्या घरचे ही त्याला काहीच बोलले नाहीत. मी पैसे न दिल्याचा राग तो नक्की काढत असेल ,असो... हा आमच्या सारख्या गरीब सामान्य लोकांना लागलेला एक कायमचा लोकडाऊनच आहे...
मन खच्चीकरण करणारा, मनाला चित्र विचित्र गवसणी घालणारा , चार चौघात बेइज्जत करणारा,आमिष दाखवून नागवणारा,तर कधी...
मनात क्रूर कल्पना आणू पाहणारा, सरकारी नियम तोडून नंग्या तलवारी हातात घ्याव्यात आणि करावा शिरच्छेद ह्या विकृत बांडगुळांचा.
असे अनेक प्रसंग सामान्य गरीब माणसाच्या जीवनात नक्की येतात पण ती लोकं हूं का चू करत नाहीत कारण त्यांना भीती असते आपल्या इज्जतीची, कोना विरुद्ध आवाज उठवणे हे त्यांना नकोसे वाटते. हे सर्व अडाणीपणामुळे घडतं हे मात्र नक्की.मग कायम आयुष्यभर अडकून राहतो अश्या नको असलेल्या कुचकामी लोकांच्या विचारांच्या लॉकडाऊन मध्ये.
मी आणि तेही.......
©आर.एस. वीर.
--------------------------------------------------------
English translation :
Lockdown .....
"Lockdown" means that ..
Not all daily transactions are closed ....
The Mumbai Corona, which was running on the thorns of Ghadala, was almost paralyzed by the epidemic. So all the people were sitting at home leaving their handiwork.
Many friends had lost their lives while serving the people. Hearing the news of their past made my heart tremble, my mind trembled, I suddenly woke up from sleep, the market of strange dreams was stirring in my mind. So I was trying to figure out how to sit still.
Every evening there was a lot of discussion on the village WhatsApp group.
Who won't read because of Corona ...
Corona is awful .....
How many cases were received today ...
How many people died today ....
How well
A lot like that ....
But I would read the message with twinkling eyes and lie in a silent group like an injured animal.
One such discussion took place at about ten o'clock one night. The discussion was about going to the village
Where to do home quarantine for Mumbaikar Mandali ...
What needs to be facilitated and much more ...
In the end, it was natural for us Konkani people to have such a life-giving discussion.
One day around eleven o'clock my phone rang. I picked up immediately after seeing an unknown number.
In front ... "Hello Mangya".
I immediately recognized the sound.
"Say it, sir," I said politely.
He was an ineffective self-proclaimed activist who deceived many and took money.
Who knows how the one who never called remembered today. I said to myself
"Ha .. bol sanjya da"
"What the heck ... you were talking on WhatsApp not because the board wanted to help the people in the village, did you have more money".
"That's how it came to my mind ... I said the board should help the destitute people. The name of your circle will be big.
"Then give me some .... money" Sanjay said to me in shock.
The company had not paid its salary for two months now.
I just said no. "I haven't paid my salary yet"
"Are you coming to the village?" Sanjaya said in a shameless smile.
"No Ray" ...
He hung up the phone in anger.
Now I was also excited to go to the village but what to do ....
I could see my moral responsibility before my eyes.
What can I say to my men who were behind me expecting financial support?
Pusat had predicted that starvation would be a worse disease than the Corona epidemic. And I would have been his victim.
"This is the path you have chosen, isn't it, then the path and fight." I said to myself.
Two days later, at the end of May, most of us went to the village.
They were "home quarantined" in a house for fourteen days. The villagers had made good living arrangements for the Mumbaikars. Nothing was left out.
No one had any idea what would happen next, how many days we would be stuck in lockdown.
Because of his habit of earning a living, he did not reach out to anyone. Neither those who were hungry were begging nor those who were eating were just giving "Zakkali Muth Savvalakhachi" .....
Now the home quarantine of Mumbaiwala was over, people were moving around and that evening too .....
One evening Sanjaya went to our house. There was a mother and a wife in the house.
Sanjay shouted at his mother and said, "Why did you leave your son to earn money? We left work and came to the village.
His words were moving.
What can we say about what is being cooked in our house, seven or eight people who earn alone will eat, they will eat when they earn a living ....
Then there was no reason to be afraid of any crisis, the fear of death was over.
I was ready to take on a thousand crises like Corona.
Sanjay came three or four times and told his family. My family didn't say anything to him ..... He must be angry that I didn't pay.
Anyway ... this is a permanent lockdown for poor ordinary people like us ...
Mind blowing ....
Wearing a strange picture to the mind ....
Insulting four fours ....
Nagging
So when ...
Trying to bring cruel ideas to mind, one should break the government rules and take up the sword with bare hands and behead the perverted gangsters.
There are many such incidents in the life of a common poor man but they don't do it because they are afraid of their dignity, they don't want to raise their voice against Kona. Of course, all this happens due to ignorance ....
Then you get stuck in a lockdown of unwanted ineffective thoughts that last a lifetime.
Me and pretty ......
© R.S.VEER
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा