Lockdown असा ही एक
Lockdown असाही एक "लॉकडाऊन" म्हणजे ते.. रोजचे सर्व व्यवहार बंद असंच ना.... घडाळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई कोरोना माहामारीच्या विळख्यात जवळपास अस्थावेस्थ झाली होती. त्यामुळे हातातला काम धंदा सोडून सर्व लोकं घरीच बसले होते. कित्येक मित्रांनी लोकांची सेवा करताना जीव गमावले होते.त्यांच्या गेल्याची बातमी ऐकताच हृदयात कंप सुटायचा, मन थरकाप व्हायचं, झोपेतून अचानक जागा व्हायचो, चित्र विचित्र स्वप्नाचा बाजार मनामध्ये घोळ घालत होता. त्यामुळे मी स्वतःला कसा बसा सावरत होतो. रोज संध्याकाळी गावाच्या वॉट्सअप ग्रुपवर खुप चर्चा चालल्या होत्या. कोरोनामुळे कोण वाचणार नाही.. कोरोना खुप भयंकर आहे..... आज किती केसेस मिळाल्या... आज किती लोक मेले.... किती बरे झाले..... असं...